जि.प.पोटनिवडणूक....कॉंग्रेसचा बडा नेता भाजप उमेदवाराच्या प्रचारात

जि.प.पोटनिवडणूक....कॉंग्रेसचा बडा नेता भाजप उमेदवाराच्या प्रचारातनागपूर:    काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर आताच नियुक्त झालेले माजी आमदार आशिष देशमुख  यांनी चक्क भाजप उमेदवाराचा प्रचाराला हजर झाल्यामुळे एकच खळबळ उडवून दिला आहे.

25 सप्टेंबर रोजी आशिष देशमुख यांनी सावरगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार पार्वता काळबांडे यांच्या प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी हजर होते. देशमुख यांनी आपल्याच निवास्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीचे फोटो आता व्हायरल झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेते त्यांच्या या भूमिकेमुळे वैतागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post