जोशी परिवाराच्या गौरी गणपतीसमोर अयोध्येतील राम मंदिराची सुंदर प्रतिकृती

 जोशी परिवाराच्या गौरी गणपतीसमोर अयोध्येतील राम मंदिराची सुंदर प्रतिकृतीनगर : बुरुडगाव रोडवरील सौरभ कॉलनी येथील जोशी परिवाराने घरातील गौरी गणपतीसमोर यंदा अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मागील वर्षी कोट्यवधी हिंदुंचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरुवात झाली आहे. या मंदिराची प्रतिकृती साकारत जोशी परिवाराने गौरी गणपतीच्या सणाचा आनंद व्दिगुणित केला आहे. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी जोशी यांच्या घरी अनेक जण आवर्जून भेट देत आहेत.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर होण्यासाठी समस्त हिंदू बांधव अनेक शतकांपासून प्रतीक्षा करीत आहेत. ही प्रतीक्षा संपुष्टात येत असून राम मंदिर निर्माण वेगाने सुरु आहे. याच अनुशंगाने जोशी परिवाराने नियोजित राम मंदिराची अतिशय सुंदर प्रतिकृती साकारत सजावट केली. यासाठी सारंग जोशी, समर्थ जोशी, समृध्दी जोशी, तृप्ती जोशी यांनी विशेष मेहनत घेतली. सोनपावलांनी आलेल्या महालक्ष्मी, रिध्दी सिध्दीची देवता गणपती आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असा श्रध्देचा त्रिवेणी संगम जोशी यांच्या घरी पहायला मिळत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post