कॉंग्रेसमध्ये मोठं इनकमिंग... कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी पक्षात दाखल

 कॉंग्रेसमध्ये मोठं इनकमिंग... कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी पक्षात दाखलनवी दिल्ली : भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. कन्हैय्या कुमार हे शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थित या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोन तरुण नेतृत्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं काँग्रेसला आता नवं बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post