पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईत रूग्णालयात दाखल

पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईत रूग्णालयात दाखल 



मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ   यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.   डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हसन मुश्रीफ यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ दोन दिवसांपूर्वी नगर दौर्‍यावरही येत होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post