भाजप प्रवेशाची ऑफर नाकारल्याने माझ्या विरोधात षडयंत्र...

भाजप प्रवेशाची ऑफर नाकारल्याने माझ्या विरोधात षडयंत्र...

 


कोल्हापूर - भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला. तसेच, मंत्री हसन मुश्रिफ आणि त्यांच्या जावयावर भ्रष्ट्राचाराचे आरोपही केले. मात्र, हे आरोप बिनबुडाचे असल्याचे हसन मुश्रिफ यांनी म्हटलंय.  

किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. मी त्यांना कोल्हापुरात येण्यापासून अडवलं नाही, तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग, आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून त्यांना पोलीस प्रशासनाने स्थानबद्ध केलं होतं. मी एकेदिवशी त्यांना कारखान्याचं पर्यटन आवर्जून करवतो, असेही मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच, माझ्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपाच्या मागे भाजपचं मोठं षडयंत्र असून याचे मास्टरमाईंड हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आहेत. पाटील ज्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात, तेथे भाजपा भुईसपाट झालीय आणि ती मीच भुईसपाट केलीय. मला भाजपाकडून वारंवार ऑफर देण्यात आल्या. पण, मी पवार एके पवार अशी भूमिका घेतल्यानेच जाणीवपूर्वक हे कट कारस्थान करण्यात येत असल्याचं मुश्रिफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post