महापूर.... शेवगाव तालुक्यातील 'हे' गाव पाण्याखाली...

महापूर.... शेवगाव तालुक्यातील कांबी गाव पाण्याखाली... नगर: शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी परिसरात  शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गावातील नदीला महापूर आला असून या पुराचे पाणी गावात घुसल्याने अनेक नागरिक व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतही पुराच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने उसा सहित अनेक पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यानं समोर मोठे संकट उभे राहिले आहे.

गावासह नजीकच्या अनेक वस्त्यांना पुराच्या पाण्याचा वेढा बसल्याने या वस्त्यांचा संपर्क अडचणीत सापडला आहे. नदीकाठच्या अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post