सुरकुटला परिवाराचा आकर्षक देखाव्यातून ऑलिम्पिक विजेत्यांना सलाम

  सुरकुटला परिवाराचा आकर्षक देखाव्यातून ऑलिम्पिक विजेत्यांना सलामनगर : टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी केली. भालाफेक, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, हॉकी अशा विविध क्रीडा प्रकारात खेळाडूंनी सुवर्ण पदकासह रौप्य व कांस्य पदके मिळवली. ऑलिम्पिकमधील या यशाचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवातही उमटले आहेत. नगरमधील डॉ.प्रशांत व डॉ.प्रीती सुरकुटला यांनी आपल्या घरातील गणेशाची सजावट ऑलिम्पिक मैदानांची प्रतिकृती साकारुन केली. अनुज सुरकुटला याने अतिशय कल्पकतेने ही सजावट केली असून याव्दारे त्याने ऑलिम्पिक वीरांना सलाम केला आहे.

डॉ.सुरकुटुला परिवाराने स्वत: घरीच शाडू मातीपासून गणपत बनवून त्याची प्रतिष्ठापना केली होती. पर्यावरणाचा संदेश देतानाच या परिवाराने खेळाडूंप्रतीही आदर व्यक्त करणारा छोटेखानी देखावा साकारला आहे. ऑलिम्पिकमधील खेळाडूंचे यश भारतातील नवोदितांना प्रोत्साहन देणारे आहे. गणेशोत्सव हा प्रबोधनाचा उत्सव मानला जातो. त्यामुळे या देखाव्याच्या माध्यमातून ऑलिम्पिक यशाचा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केल्याचे सुरकुटला यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post