कत्तलखान्यावर छापा... गोवंश जनावरांची सुटका, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलखान्यावर छापा... गोवंश जनावरांची सुटका, १८ लाखांचा मुद्देमाल जप्तनगर:  नेवासा  तालुक्यातील चांदा येथील अवैध कत्तलखान्यावर सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व त्याच्या सहकारी पथकाने छापा टाकून जवळपास १८ लाख ३० हजार रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मंगळवार  रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चांदा येथील कुरेशी मोहल्ला येथे एक आयशर टेम्पो व महिंद्रा जीप गाडीमध्ये २७ गोवंश जातीची जनावरे क्रूरतेने जनावरे बांधलेल्या स्थितीत आढळून आली.

याप्रकरणी सोनई पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव यांनी फिर्याद दाखल केली असून त्यानुसार सोनई पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. यामुळे चांदा परिसरात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post