पेरणी करताना बांधावर ट्रॅक्टर पलटी, दोघांचा चिरडून मृत्यू

 

पेरणी करताना बांधावर ट्रॅक्टर पलटी, दोघांचा चिरडून मृत्यू



नगर: ट्रॅक्टरच्या मदतीने शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकर्‍याचा व 13 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला.

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाणमधील अलभरवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय 38 रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येउन त्यास अटक करण्यात आली आहे. सुपे पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार दि. 24 रोजी दुपारी जालिंदर दुलदगड हा वाडेगव्हाण शिवारातील शेतामध्ये छोट्या ट्रॅक्टरने पेरणी करीत होता. पेरणी यंत्रावर तुकाराम भिमाजी तरडे (वय 48) व शुभम दत्तात्रय तरडे (वय 13) हे बसलेले होते.

पेरणी सुरू असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक जालिंदर याने  ट्रॅक्टर चालवून तो बांधावर घातला. बांधावर गेलेला ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तुकाराम भिमाजी तरडे व शुभम दत्तात्रय तरडे हे चिरडले गेले. त्यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला. 


राजेंद्र बाळासाहेब शेळके (रा. वाडेगव्हाण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम तरडे व शुभम तरडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबददल जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय 38 रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post