खा.विखेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आ.रोहित पवारांची प्रतिक्रिया...

 विखेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा 

बॅंकेची निवडणूक ठराविक लोकांमधून होते तर नगरपरिषद, नगरपंचायत जनतेतून होते - आ. रोहीत पवार

    


जामखेड प्रतिनिधी नासीर पठाण - जिल्हा बँकेची निवडणूक ही ठराविक लोकांतून होत असते तर नगर पंचायत, नगरपरिषद निवडणूक जनतेतून होत असते. आमचा जनतेवर विश्वास आहे आम्ही लोकांच्या मनात काय आहे हे लोकात राहील्याशिवाय कळत नाही. नुसते ठरावीक ठिकाणी येऊन कोणीतरी एखादे वक्तव्य केले त्याच्यामध्ये तथ्य नसेल तर त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे असे प्रतिउत्तर आ. रोहीत पवार यांनी खा. विखे यांचे नाव न घेता दिले. 

             आ. रोहीत पवार हे जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता खर्डा येथे पत्रकारांनी आ. पवार यांना भाजप पदाधिकारी प्रसाद ढोकरीकर व इतर दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावर खा. विखे यांनी नगरपंचायत, नगरपरिषद निवडणूकीत जिल्हा बँकेची पुनरावृत्ती होईल अशी टिप्पणी केली होती त्यावर बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले त्यांचे ते राजकीय वक्तव्य आहे त्याकडे किती लक्ष द्यायचे हे आम्ही ठरवत असतो.

      जिल्हा बॅंकेची निवडणूक ठरावीक लोकांतून होत असते. त्यासाठी आवश्यक बांधणी करावी लागते ते आमच्याकडून झाले नाही तरी सुद्धा कमी बांधणी असताना बहुतांश मतदान आपल्याकडून झाले. परंतु "हार ही हार" असते आता नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक जनतेतून होणार आहे आमचा लोकांवर विश्वास आहे. लोकांच्या मनात काय आहे हे लोकांत राहील्याशिवाय कळत नाही. आमचा लोकांवर विश्वास आहे असे आ. रोहीत पवार म्हणाले.         

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post