धक्कादायक....नदीत पोहायचा मोह जीवावर बेतला.. ५ तरूणांचा बुडुन मृत्यू

 धक्कादायक....नदीत पोहायचा मोह जीवावर बेतला.. ५ तरूणांचा बुडुन मृत्यू



नागपूर : कन्हान नदीत गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुडालेल्या युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत.


यवतमाळहून दहा मित्रांचा ग्रुप नागपूरला आला होता. हे तरुण 19 ते 21 वर्ष वयोगटातील होते. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी कन्हान नदीपात्रात उचलून पोहण्याचा मोह काही जणांना झाला. मात्र पोहायला गेलेल्या पाच युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. सगळे युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे असल्याची माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post