भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

 भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रियामुंबई : परळी येथे करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शर्मा यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच  आज त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी बीड पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अ‌ॅट्रॉसिटीचा एवढा दुरूपयोग कधीही पाहिली नव्हता. भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते पुण्यात माध्यामांशी बोलत होते. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post