नाव पत्ता माहीती नसताना केवळ फोटो द्वारे खून प्रकरणातील आरोपी जेरबंद, एलसीबीची कामगिरी... व्हिडिओ

 खून करून फरार झालेला आरोपी नाव पत्ता माहीती नसताना केवळ फोटो द्वारे जेरबंद, एलसीबीची कामगिरी

 


नगर: नगर मनमाड महामार्गावर राहूरी येथील साक्षी हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरुन वेटरची हत्या करुन फरार झालेला आरोपी बाहेरगावी पळून जाण्याचे तयारीत असताना नगर शहरात पुणे बस स्थानक येथून जेरबंद करण्यात आला आहे. 

 दिनांक १९ रोजी मध्यरात्री नगर-मनमाड रोडवरील राहूरी शिवारातील साक्षी हॉटेल येथे वेटरचे काम करणारा नामदेव याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सदर हॉटेलमध्ये काम करणारा वेटर सोनू नारायण छत्री ( वय २७ वर्षे, रा. जोडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) याचे डोक्यामध्ये लोखंडी पहारीने वार करून त्याची हत्या करुन फरार झाला होता. सदर घटनेबाबत साक्षी हॉटेलचे मालक प्रमोद बापूसाहेब म्हसे यांनी राहूरी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन  आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग तसेच पोनि/ अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून घटनेची व आरोपीची माहिती घेतली. त्यानंतर मा. पोलीस अधिक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे, सपोनि/गणेश इंगळे, पोसई/सोपान गोरे, पोहेकों/विश्वास बेरड, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, सुनिल चव्हाण, पोना/दिपक शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकों/ सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रविन्द्र घुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, विनोद मासाळकर, मच्छिन्द्र बर्डे, विजय धनेधर, चालक पोहेको / चंद्रकांत कुसळकर असे आरोपीचा शोध घेत होते.

सदरचा गुन्हा घडला त्यावेळी आरोपीचे नांव फक्त नामदेव मामा एवढेच असल्याने  आरोपीचे प्राप्त फोटोचे आधारे बातमीदारामार्फत पूर्ण नाव, पत्त्याबाबत माहिती प्राप्त केली. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे मूळ गाव तसेच शेवगाव बस स्टैंड, पाथर्डी बस स्टैंड, अहमदनगर शहरातील सर्व बस स्थानके, रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये शोध घेतला. परंतू सदर आरोपी हा फिरस्ता असल्याने आरोपीबाबत काही एक उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. पथकातील अधिकारी व अंमलदार हे बातमीदारांकडून माहिती घेवून आरोपीचा शोध घेत असताना पोनि अनिल कटके यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली कि फरार आरोपी नामदेव हा अहमदनगर शहरात पुणे बस स्थानक परिसरामध्ये फिरत असून तो बाहेरगावी कोठेतरी पळून जाण्याचे तयारीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार पुणे बस स्थानक येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपीस पुणे बस स्थानक, अहमदनगर येथून ताब्यात घेवून त्यांस पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे पूर्ण नाव, पत्त नामदेव केशव दराडे, वय- ३० वर्षे, रा. गोळेगाव, ता. शेवगांव, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. आरोपीस विश्वसात घेवून नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची


माहिती दिल्याने आरोपीस राहूरी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही राहूरी पो.स्टे. करीत आहेत.


सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे.

व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post