आ.निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी...किरीट सोमय्यांना पत्र

 


आ.निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी...किरीट सोमय्यांना पत्रनगर : संपूर्ण देशात नावाजल्या जात असलेल्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरबाबत भाजपने आक्षेप नोंदविला आहे. सदरचे केंद्र शासकीय असताना व येथील सर्व सुविधा शासनाने दिल्या असताना या केंद्रासाठी देशविदेशातून कोट्यवधींच्या देणग्या जमा करण्यात आल्या. यातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची शक्यता असून सदर कोविड सेंटरच्या चौकशीसाठी भाजपचे जिल्हा सहसंयोजक प्रितेश रवींद्र टकले यांनी माजी खा.कीरीट सोमय्या यांना पत्र दिले आहे. टकले यांनी सोशल मिडियावर हे पत्र टाकले असून सोमय्या यांना या प्रकरणात आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. किरीट सोमय्या पारनेर दौर्‍यावर येत असताना हे पत्र व्हायरल झाल्याने लंके समर्थकांकडून कोणते उत्तर दिले जाते याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार मा.निलेश लंके यांनी कोव्हीड सेंटर मध्ये केलेल्या घोटाळ्या विषयी आपण आवाज उचलतान अशी अपेक्षा बाळगतो....

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post