शरद पवार यांचा 9 फुटी मेटलचा पुतळा...सुप्रिया सुळेंनी केले शिल्पकार महिलेचे कौतुक

शरद पवार यांचा 9 फुटी मेटलचा पुतळा...सुप्रिया सुळेंनी केले शिल्पकार महिलेचे कौतुक
 पुणे : पुण्यातील महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी  शरद पवार यांचा 9 फुटाचा मेटलचा पुतळा बनवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली.  तसंच सुप्रिया शिंदे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी यांचाही मेटलचा पुतळा बनवला आहे.  

शरद पवार यांचा मेटलचा पुतळा बनवला जात आहे. त्यासाठी दीड टन मेटलचा वापर करण्यात आलाय. पवारांचा हा पुतळा साकारण्यासाठी तब्बल 8 महिन्याचा कालावधी लागला. रोज 10 तास काम करुन हा पुतळा साकारल्याचं शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी पवारांच्या पुतळ्याची पाहणी केली आणि शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचं कौतुक केलं. सुप्रिया शिंदे यांना आतापर्यंत 3 पुरस्कार मिळाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पवारांचा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतला होता. इंटरनेटवर पवारांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून हा पुतळा साकारल्याचं शिंदे म्हणाल्या.


पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post