'उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली'…म्हणणार्‍या ‘अलार्म काकांचे’ निधन

ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जायचे. ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून ते फार प्रसिद्ध होते.


विद्याधर करमरकर यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे. फक्त चित्रपट नव्हे तर त्यांच्या जाहिरातीही प्रचंड गाजल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post