जिल्हाधिकार्‍यांनी पटकावले टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक

जिल्हाधिकार्‍यांनी पटकावले टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आणि गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज   यांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. त्यांना फ्रान्सच्या वर्ल्ड नंबर वन लुकास मजूरने 63 मिनिटांत 15-21, 21-17, 21-15 असे हरविले. 38 वर्षीय सुहास यांनी पॅरालिम्पकमध्ये बॅडमिंटन इव्हेंटमध्ये प्रमोद भगत च्या सुवर्ण पदकानंतर रौप्य पदक पटकावले. आता या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या पदकांची संख्या ही 18 झाली आहे. सुहास यांच्या या दैदिप्यमान कामगिरीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतूक केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post