तहसीलदार देवरे यांनी पदाचा दुरुपयोग करीत केला मोठा भ्रष्टाचार....चौकशीसाठी नगर ‘एसीबी’कडे तक्रार दाखल

तहसीलदार देवरे यांनी पदाचा दुरुपयोग करीत केला मोठा भ्रष्टाचार....चौकशीसाठी नगर ‘एसीबी’कडे तक्रार दाखल नगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांनी अपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी जातेगाव (ता. पारनेर) येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना मंगळवारी तक्रार अर्ज देण्यात आला. 

या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. या अहवालात देवरे यांनी वाळूउपसा केलेली वाहने जप्त केल्यानंतर कुठलेही सरकारी शुल्क भरून न घेता ती वाहने सोडून दिली, अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे तसेच देवरे या जळगाव येथे कार्यरत असतानाही भ्रष्टाचार केल्याच्या बाबी अहवालात नमूद आहेत. देवरे यांची बदली झालेली असली तरी कामाचे स्वरूप तेच राहणार आहे. त्यामुळे देवरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पोटघन यांची आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post