रोटरी क्लबच्या वतीने ओंकारनगर शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शूजचे वाटप.

 रोटरी क्लबच्या वतीने ओंकारनगर शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शूजचे वाटप.


आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा.रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटीग्रिटीच्या वतीने महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अहमदनगर शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल शूजचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना वाचनाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटीग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, सचिव हेमंत लोहगांवकर, निवॄत्त समाजकल्याण अधिकारी रफिक मुंशी, रोटरी क्लब अहमदनगर मिडटाऊनचे माजी अध्यक्ष क्षितीज झावरे,लिटरसी डायरेक्टर  किशोर डोंगरे,श्री.आहेर, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, विद्यार्थी पालक उपस्थित होते.

रोटरी क्लबचे मनपा ओंकारनगर शाळेच्या विकासात मोलाचे योगदान आहे.रोटरी क्लबच्या मदतीने आपण शाळेत विविध प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.गेल्या सहा वर्षांपासून रोटरी क्लब ओंकारनगर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या साहित्याची मदत करत आहे,असे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले.

ओंकारनगर शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करतात.विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी रोटरी क्लबच्या संपर्कात राहतात.विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप अभ्यास करावा.विद्यार्थ्यांना लागणारे सर्व आवश्यक साहित्य आम्ही यापुढेही देऊ,असे क्षितीज झावरे आपल्या मनोगतात म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post