चित्रा वाघ यांचा पुन्हा एकदा आ.निलेश लंके यांच्यावर निशाणा, व्हायरल केला महत्त्वपूर्ण फोटो

 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा पुन्हा एकदा आ.निलेश लंके यांच्यावर निशाणामुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन पुन्हा एकदा आ.निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे. एका विमानप्रवासाचा हा फोटो असून यात आ.लंके यांच्या बरोबर पोलिस निरीक्षक व एक पोलिस कर्मचारी असल्याचे वाघ यांनी नमूद केले आहे. हे सगळे तहसीलदार ज्योती देवरेच्या बदली साठी या सगळ्यांनी केलेला नवस फेडायला गेलेत म्हणे.. असा दावा वाघ यांनी केला आहे.चित्रा वाघ यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की,

ओळखलतं का यांना ?

नगर पारनेरचे PI बळप(रेड) तर पोलिस दिवटे(ब्लू)

आमदार निलेश लंके या २ पोलिसांना विमानाने फिरवून आणताहेत

एव्हढी बडदास्त आमदार ठेवतोय म्हंटल्यावर त्याने या पोलिसांसमोर कुठल्या महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईसाठी ??

तहसीलदार ज्योती देवरेच्या बदली साठी या सगळ्यांनी केलेला नवस फेडायला गेलेत म्हणे.. एका महिलेला हटवल्याचा असूरी आनंद दिसतोय चेहर्यावर…वाईट गोष्ट ही कि यात सरकारमधल्यांपासून सगळेच सहभागी… आम्ही ही चिवट आहोत लढत राहू शेवटपर्यंत तुमच्या तोंडाला फेस आणेपर्यंत…

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post