नगर शहरासह राज्यात जोरदार पाऊस ...

 नगर शहरासह राज्यात जोरदार पाऊस ... नगर:  नगर शहरात पावसाचा जोर कायम असून सोमवारी  दुपारी ४ नंतर पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. रविवारी रात्रभर संततधार कायम राहीली. 

दरम्यान राज्यातील‌ज्य मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमशान घातलं आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी घरं पाण्यात गेली आहेत. या पावसामुळं काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post