मुलासाठी पत्नीवर अत्याचार, नीच पती व त्याच्या मित्राची १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी

 

मुलासाठी पत्नीवर अत्याचार, नीच पती व त्याच्या मित्राची १४ दिवसांच्या कोठडीत रवानगीनगर: मूल होण्यासाठी नराधम पतीने व  मित्रासह  पत्नीवर अत्याचार केला. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पती व त्याच्या मित्राला अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तुला मूल होण्यासाठी माझ्या मित्राशी शरीरसबंध ठेव, असे सांगत पतीनेच पत्नीचा घात केला. पतीने गोळ्या दिल्या आणि मला चक्कर आली. त्यानंतर पती व त्याच्या मित्राने माझ्यावर अत्याचार केला. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली. दुसर्‍या दिवशीही दोघांनी पुन्हा अत्याचार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात  घडली.

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.  रविवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची कोठडी दिली. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत असून त्यांना हवालदार देविदास तांदळे हे मदत करत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post