नराधम पित्याचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार‌‌... नगर जिल्ह्यातील घटना

 नराधम पित्याचा  पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार‌‌... नगर जिल्ह्यातील घटनानगर : दोनच दिवसांपूर्वी जगभरात कन्या दिवस (daughter's day) साजरा झाला. बापलेकीच्या नात्याची सुंदरता यानिमित्त व्यक्त झाली.  पण नगर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेच्या आईने तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

पीडित 11 वर्षीय चिमुकलीची आई 28 जुलैला काही कारणास्तव बाहेरगावी गेली होती. त्याचदिवशी रात्री पीडितेच्या पित्याने ती झोपेत असताना तिच्यासोबत गैरप्रकार केला. विशेष म्हणजे आरोपीने त्यानंतरही पुन्हा दोनवेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान आई गावावरुन घरी आल्यानंतर पीडितेने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला.

पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या सांगण्यानुसार आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post