शिवसेनेला नेत्याकडूनच अनिल परब यांना अडचणीत आणण्याचे काम

 शिवसेनेला नेत्याकडूनच अनिल परब यांना अडचणीत आणण्याचे काम, मनसेचा खळबळजनक दावाखेड,  : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच्या त्या संदर्भात त्यांनी ईडीकडे कागदपत्रेही सोपवली आहेत. राज्याचे परिवहवन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब  यांच्या संदर्भातही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आता या प्रकरणात मनसेने उडी घेत एक मोठा दावा केला आहे.


शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम  यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. मग ही माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक दावा मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post