भाजप जिल्हाध्यक्षांनी अडवाअडवीची भाषा करू नये, पालकमंत्री मुश्रीफ यांचे नगर जिल्हा जंगी स्वागत करणार

 पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अहमदनगर जिल्हा जंगी स्वागत करणार : राजेंद्र फाळकेनगर: भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या कथित आरोपानंतर मुश्रीफ यांना नगर जिल्ह्यात येऊ न देण्याची भूमिका मांडली. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

फाळके यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्यात स्वागत इथून मागेही केले आहे व इथून पुढेही करणार आहे . ‘ज्या गावच्या बोरी त्यांच गावच्या बाभळी’ असतात हे भाजपा जिल्हाध्यक्षांनी विसरू नये. आदरणीय पवार साहेबांनी जशी ईडी पळवून लावली तशीच मुश्रीफ साहेबांनी सुध्दा ईडी ला एकदा पळवून लावले आहे. लहान मुल बोबडं बोलतांत म्हणून आपण त्याचे सर्वच हट्ट पूरवत नाही. अहमदनगर जिल्हा हा विचाराचे राजकारण करणारा जिल्हा आहे. इथे अडवा अडवीची भाषा करणा-यांना जशास तसे उत्तर देण्याची सवय आहे. त्यामुळे आपला अज्ञानपणा भाजपा जिल्हाध्यक्षाने प्रदर्शित करु नये , अशी खरमरीत प्रतिक्रिया फाळके यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post