शिर्डी हादरले... जुन्या वादातून एकाचा निर्घृण खून

 

शिर्डी हादरले... जुन्या वादातून एकाचा निर्घृण खून



शिर्डी: जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार करून एका 26 वर्षीय युवकाचा खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डी शहरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


दोन मित्रांनी मिळून एकावर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला व त्यानंतर आरोपी स्वतःहून शिर्डी पोलीस स्टेशनला हजर झाले. पोलिसांनी या दोन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


या हल्ल्यात मृत झालेला अजय कारभारी जगताप हा युवक तळेगाव दिघे येथील असून तो शिर्डीमध्ये भीमनगर येथे राहात होता तर आरोपी अक्षय सुधाकर थोरात,( वय 24 वर्ष रा. जवळके, ता. कोपरगाव) व रोहित बंडू खरात, (रा. शिर्डी) या दोघांनी मिळून शिर्डी येथे स्वतःच्या असलेल्या गाळ्यात या युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.. पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post