मुख्यमंत्र्यांना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल

मुख्यमंत्र्यांना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकेल. जिथपर्यंत सरकार चालवायचं तो पर्यंत ते चालवतील व नंतर पुढचा निर्णय घेतील. त्यामुळे सरकार टिकवायचं की नाही हे पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, असं शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड म्हणाले. ते उस्मानाबाद येथे बोलत होते. बोलता बोलता त्यांनी महाविकास आघाडीबाबत खूपच मोठं वक्तव्य केलं.

सध्या सरकार स्थिर आहे मात्र ते टिकवायचे की नाही आणि किती काळ टिकवायचं हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हातात आहे. सरकार स्थापन झाल्या पासून 2 महिन्यात पडेल, अशा अफवा भाजप पेरत आहे. मात्र सरकारचा निर्णय फक्त ठाकरे यांच्या हातात आहे, असंही संजय राठोड म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post