नगर शहरासह राज्यात पावसाचं धुमशान... शहरात संततधार

 नगर शहरासह राज्यात पावसाचं धुमशान... शहरात संततधार




नगर:  नगर शहरात पावसाची संततधार कायम असून शनिवारी रात्रभर बरसल्यानंतर रविवारी दुपारी ४ नंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली. शनिवारी रात्रभर संततधार कायम राहीली. रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्यावर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा संततधार चालू आहे. सोमवारी श्रावण पोळा सण असून बाजारात मातीची बैलजोडी विकण्यास बसलेल्यांची माल वाचवताना तारांबळ उडाली.

दरम्यान राज्यातील‌ज्य मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमशान घातलं आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी घरं पाण्यात गेली आहेत. या पावसामुळं काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे.  


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post