जिल्ह्यात आज ‘इतक्या’रूग्णांना डिस्चार्ज,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२९ टक्के

 दिनांक ०८ सप्टेंबर, २०२१

आज ७२५ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ८५७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२९ टक्केअहमदनगर: जिल्ह्यात आज ७२५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १७ हजार ६१६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६३५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७९ आणि अँटीजेन चाचणीत ३५२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, अकोले ०१, जामखेड १६, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०४, पारनेर ५६, पाथर्डी ३३, राहता ०२, राहुरी ०१, संगमनेर ६२, श्रीगोंदा २७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०६आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले १३, जामखेड ०४, कर्जत १९, कोपरगाव ११, नगर ग्रा.११, नेवासा १८, पारनेर २२, पाथर्डी ०३,  राहाता १८, राहुरी २१, संगमनेर ६६, शेवगाव ३७, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर १५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३५२ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, अकोले ५७, जामखेड ०२, कर्जत ३०, कोपरगाव ०९, नगर ग्रा. ०६, नेवासा ३७, पारनेर २४, पाथर्डी ०९, राहाता ०४, राहुरी ०७, संगमनेर ८८, शेवगाव २५, श्रीगोंदा ४१, श्रीरामपुर ०६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ६९, जामखेड ३१, कर्जत २२, कोपरगाव १३, नगर ग्रा. ४७, नेवासा १८, पारनेर १२०, पाथर्डी ४४, राहाता ३४, राहुरी २७, संगमनेर १६६, शेवगाव ३०, श्रीगोंदा ६३, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post