कानून से बचना मुश्किल है....१२ वर्ष फरार असलेला आरोपी अखेर सापडलाच...

 कानून से बचना मुश्किल है....१२ वर्ष फरार असलेला आरोपी अखेर सापडलाच...नगर: दरोड्याच्या गुन्ह्यात मागील १२ वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केडगाव मार्केटयार्ड येथे अटक केली. अशोक सदाशिव वनवे (रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी वनवे व त्याच्या अन्य साथीदारांविरोधात २००९ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामिनावर मुक्त झाल्यापासून वनवे पसार होता. सदर केसमध्ये आरोपीला हजर राहण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. तो हजर न झाल्याने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

या वॉरंटची बजावणी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. आरोपी वनवे याचा शोध पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, संदीप पवार, संदीप घोडके यांचे पथक घेत होते. आरोपी वनवे केडगाव कांदा मार्केट येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post