मंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदारामध्ये भर बैठकीत जोरदार खडाजंगी

 मंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदारामध्ये भर बैठकीत जोरदार खडाजंगीनाशिक : नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार  आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले.

आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये झाली बाचाबाची झाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत एकच गोंधळ उडाला.'निधी मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सांगून झाले, काहीच पुढे होत नाही', असं म्हणत कांदे यांनी संताप व्यक्त केला.

त्यावर भुजबळ म्हणाले की, आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत, जेव्हा एखाद्या मंत्र्याने जरी सांगितले असेल तर फोनवर जरी बोलणं झालं तर जिल्हाधिकाऱ्यांकडून काम होऊन जाईल, असं आश्वासन भुजबळ यांनी दिलं.

बैठकीत झालेल्या वादानंतर आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी केली. त्यामुळे काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post