गरजूंना मोफत उपचार... नगरमध्ये सुरू होणार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष

 वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष नगर शहरात ऑक्‍टोबर 2021 पासून कार्यान्‍वीत होणार -  मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे



      शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा.ना.श्री.उध्‍दवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते युवा सेना  प्रमुख तथा राज्‍याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री मा.ना.श्री.आदित्‍यजी ठाकरे साहेब यांच्‍या मार्गदर्शना खाली तसेच शिवसेना नेते राज्‍याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्‍हा पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, मा.खा.डॉ.श्री.श्रीकांत शिंदे साहेब यांच्‍या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष अहमदनगर शहरात ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. शिवसेना वैदयकिय मदत कक्षाच्‍या माध्‍यमातून आपण गोरगरिब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रूग्‍णांना धर्मादाय रूग्‍णालयात 20 टक्‍के राखीव बेड उपलब्‍ध करून देणार आहे. निकषात बसत असलेल्‍या गरिब रूग्‍णांवर पूर्णत: मोफत किंवा सवलतीच्‍या दरात शस्‍त्रक्रिया करण्‍या संदर्भातील मदत तसेच महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्‍या रूग्‍णालयामध्‍ये गरजू रूग्‍णांना शस्‍त्रक्रिया मोफत करणे व त्‍या संदर्भात योग्‍य मार्गदर्शन सदैव तत्‍पर ठेवणे.


      यावेळी मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले की, कोवीड 19 मुळे दोन वर्षापासून गोरगरिब जनता आजारामुळे हैराण झाली आहे. दिवसें दिवस दवाखान्‍याचा खर्च सामान्‍य नागरिकांना झेपत नाही. हॉस्‍पीटलचे बिल वाढत्‍या महागाईमुळे वाढत आहे. शिवसेना हा पक्ष गोरगरिब नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवित असते.      


      गोरगरिब नागरिकांना दवाखान्‍याचे दिवसें दिवस खर्च करता येत नाही. परिस्‍थीती हालाखीचे असते. गंभीर शस्‍त्रक्रिया करावयाची असल्‍यास मोठा खर्च येतो. त्‍यासाठी मा.पंतप्रधान वैद्यकिय सहाय्यता निधी मा.मुख्‍यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधी श्री सिध्‍दीविनायक ट्रस्‍ट, टाटा ट्रस्‍ट, या सारख्‍या विविध ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातून मदत मिळून देण्‍यासाठी नागरिकांना थेट शिवसेना भवन येथे किंवा ठाणे येथील कोपरी मध्‍यवर्ती कार्यालयात संपर्क साधावा लागतो. त्‍यासाठी राज्‍याचे कक्ष समन्‍वयक श्री.मंगेश चिवटे, यांनी नगर शहरासाठी शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाची घोषणा केली आहे.

      याकार्यक्रमाच्‍या वेळी पश्चिम महाराष्‍ट्र संपर्क प्रमुख मा.श्री.राजाभाऊ भिलारे, तसेच मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे, मा.श्री.संजय शेंडगे, जिल्‍हाप्रमुख  मा.श्री.शशिकांतजी गाडे, जिल्‍हाप्रमुख मा.श्री.राजेंद्र दळवी, माजी शहर प्रमुख मा.श्री.संभाजी कदम , उपजिल्‍हाप्रमुख मा.श्री.संदेश कार्ले नगरसेवक मा.श्री. सचिन शिंदे, मा.श्री.आप्‍पा नळकांडे, मा.श्री.मदन आढाव, मा.श्री.धनंजय जाधव, मा.श्री.जितेंद्र सातव,  श्री.मंगेश शिंदे, श्री;अंबादास शिंदे, श्री.मकरंद राजहंस, श्री.महेश शेळके, श्री.गिरीष हांडे, श्री.महेश गागरे, श्री.मच्छिंद्र भवर, श्री. अक्षय बडे,  आदी उपस्थित होते.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post