आमदाराचा चक्क चड्डी बनियनवर रेल्वे प्रवास.... आक्षेप घेतल्यावर प्रवाशांनाच दमबाजी

आमदाराचा चक्क चड्डी बनियनवर रेल्वे प्रवास.... आक्षेप घेतल्यावर प्रवाशांनाच दमबाजीी पाटणा : बिहारचे  जनता दल युनायटेडचे आमदार नरेंद्र कुमार नीरज यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. आमदार  अंडरवेअरवर रेल्वेत फिरत असताना त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. राजधानी एक्स्प्रेसमधील हा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोटोत आमदार नरेंद्र कुमार हे चड्डी बनियानवर दिसत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे या आमदार महाशयांच्या कृत्यावर सहप्रवाशांनी आक्षेप घेतला. त्यावेळी आमदारांना चांगलाच राग आला. नरेंद्र कुमार नीरज यांनी थेट प्रवाशांना शिव्याच हासडल्या. आमदार  यावरच थांबले नाही तर त्यांनी एका प्रवाशाला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. ही बाचाबाची सुरु असताना RPF ला बोलवावं लागलं. त्यानंतर हे प्रकरण मिटलं.


आमदार नरेंद्र कुमार नीरज हे पाटण्यावरुन दिल्लीला तेजस राजधानी एक्स्प्रेसने निघाले होते. या प्रवासादरम्यान आमदारांनी  रेल्वेतच कपडे उतरवले. पाटण्यावरुन ट्रेन सुटताच, त्यांनी कपडे उतरवले. त्यानंतर ते चड्डी-बनियनवर ट्रेनच्या डब्ब्यात चकरा मारु लागले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post