ग्रामीण भागात जनावरांच्या लसीकरणाची आवश्यकता... लाळ्या खुरकतने 'या' तालुक्यात गायींचा मृत्यू

 

ग्रामीण भागात जनावरांच्या लसीकरणाची आवश्यकता... लाळ्या खुरकतने राहुरी तालुक्यात गायींचा मृत्यूनगर: जिल्ह्यात ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कायम असताना आता जनावरांमध्ये लाळ्या-खुरकूत आजाराचा संसर्ग पसरत आहे.राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाल्याने चार गायी दगावल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

आंबी येथील चारी नं. 01 वरील भावेश तागड, नितीन मतमोल यांच्या दोन दुभत्या जर्सी गाई व डुकरे वस्तीवरील माजी सरपंच शंकर डुकरे यांची एक गाय लाळ्या खुरकूत आजाराने मृत्युमुखी पडली आहे. त्यामुळे या गोपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत मृत गाईंचे शवविच्छेदन करत नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.

तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भवर, आंबी-अंमळनेर येथील डॉ. दत्तात्रय साळुंके, डॉ. अजित सालबंदे लसीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post