राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा... जयंत पाटील बुधवारी नगरमध्ये...

 

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा... जयंत पाटील उद्या नगरमध्ये...नगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील बुधवारी नगरच्या दौर्‍यावर येत असून, राष्ट्रवादी परिवार संवादच्या माध्यमातून ते ग्रामीण आणि शहर संघटनेच बैठक घेणार आहेत.  


बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता जलसंपदा अधिकार्‍यांसमवेत प्रथम बैठक होणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांसमवेत ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर नगर शहर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. संग्राम जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते सुपे येथे जाऊन आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पारनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 

तेथेच श्रीगोंदा मतदारसंघाचा आढावा घेऊन तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याच्या निमित्ताने होणार्‍या या सर्व बैठका राष्ट्रवादी भवन येथे होणार आहेत. 

बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचा प्रत्येक पदाधिकारी, सदस्य तसेच प्रत्येक सेलचे प्रमुख पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post