कर्जत जामखेड, नगरला आय.टी.सेंटरसाठी बड्या कंपनीशी चर्चा


कर्जत जामखेड, नगरला आय.टी.सेंटरसाठी बड्या कंपनीशी चर्चा, आ.रोहित पवार यांची माहिती नगर: 'Capgemini' या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी बारामती, कर्जत-जामखेड, नगर,सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये IT सेंटर सुरू करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली, अशी माहिती आ.रोहीत पवार यांनी दिली.

यावेळी या शिष्टमंडळाने विद्या प्रतिष्ठान आणि 'ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट'ला भेट देऊन विविध प्रकल्पांचीही माहिती घेतली. यामध्ये कंपनीच्या CEO अश्विनी यार्डी, कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष जगदीश कुचम आणि कुमार अनुराग प्रताप यांचा समावेश होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post