साहेब आम्हाला माफ करा..आमचं ठरलय पुन्हा प्रा. राम शिंदे साहेबच..!

 साहेब आम्हाला माफ करा..आमचं ठरलय पुन्हा प्रा. राम शिंदे साहेबच..!नगर(सचिन कलमदाणे): कर्जत जामखेड मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे यांना पराभूत व्हावे लागले. मात्र आता दैन अडीच वर्षांनी मतदार संघात शिंदे यांच्या बाबतीत सहानुभूती व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर आज शिंदे समर्थकांनी विशेष पोस्ट व्हायरल केली आहे. यात 'साहेब आम्हाला माफ करा..आमचं ठरलय पुन्हा प्रा. राम शिंदे साहेबच..!' असा सूर लावण्यात आला आहे. बैलपोळा सणाला बैलजोडी सजवलेल्या नंतर त्यावर हा मजकूर लिहून समर्थकांनी शिंदे यांच्या बाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post