नगरमधील २ लाखांच्या खंडणीचे प्रकरण... न्यायालयाने दिला निकाल

 दोन लाख रुपये खंडणी मागितली : 12 निर्दोष     नगर - वैदुवाडी, भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड येथे दि.21/03/2016 ते दि.23/03/2017 या काळात फिर्यादी रा.शिवनगर, निर्मलनगर, सावेडी, अहमदनगर यास जाती बाहेर काढून पुन्हा जातीत समाविष्ट करण्यासाठी रुपये दोन लाखाची मागणी केली तसेच शिवीगाळ केली, दमदाटी केली म्हणून फिर्यादीच्या फिर्यादीहून तोफखाना पोलिसांनी आरोपी मारुती सिताराम शिंदे, बाबू शंकर धनगर (मयत), मुस्ला शंकर शिंदे, बापू यादव शिंदे, मच्छिंद्र शंकर धनगर, आंबू बापू शिंदे बापू तात्या शिंदे (मयत), नारायण आंबू धनगर, गोरख नाथा धनगर, तायगा बाबू धनगर, संतोष मच्छिंद्र धनगर, राजू उर्फ तात्या मारुती धनगर सर्व रा.वैदुवाडी, सावेडी, अहमदनगर यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम 385, 120 (ब), 504, 506, सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला असता त्याची सुनावणी होऊन वरील सर्व आरोपींची मुख्य न्यायाधिश अहमदनगर यांनी निर्दोष मुक्तता केली. सर्व आरोपींतर्फे अ‍ॅड.सतिशचंद्र वि.सुद्रिक यांनी काम पाहिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post