रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील शिवसेनेच्या वाटेवर...

 

रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील शिवसेनेच्या वाटेवर...जयंत पाटील यांचे मोठं वक्तव्य



मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून धुरळा उडवून दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. 

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेते काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असा चिमटा पाटील यांनी काढला

महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. हे सरकार स्थिर आहे. दोन वर्ष भाजपचे नेते असंच बोलत आहेत. त्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post