पाऊस येतोय परत....राज्यात तीन दिवस जोरदार बरसणार...

पाऊस येतोय परत....राज्यात तीन दिवस जोरदार बरसणार... मुंबई : राज्यात उद्यापासून ३ दिवस जोरदार पाऊस  होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने  हा अंदाज वर्तविला आहे. उद्यापासून म्हणजे 4 ते 6 सप्टेंबर या दरम्यान राज्यात पाऊस परत एकदा जोर धरणार आहे. आज बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. येणाऱ्या ५ सप्टेंबरसाठी हवामान खात्याने पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्याकरिता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ६ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसहीत मराठवाडा आणि विदर्भ मधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ३-४ दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करणार आहे, अशी शक्यता वर्तवली गेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post