शिर्डी साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाला स्थगिती

शिर्डी साईबाबा संस्थानच्या नवीन  विश्वस्त मंडळाला स्थगिती



नगर: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाने अवघ्या पाच दिवसांतच स्थगिती दिली आहे. विश्वस्त मंडळाशी संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू असताना न्यायालयाला अवगत न करता नव्या मंडळाने सूत्रे कशी स्वीकारली? अशी विचारणा न्यायालयाने केली असून यावर २३ सप्टेंबरला म्हणने सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सरकारने विश्वस्त मंडळ जाहीर करताना आ.आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी निवड केली. मात्र आता न्यायालयीन निर्णयावर या विश्वस्थांचे भवितव्य अवलंबून आहे.


उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. महत्वाची बाब म्हणजे न्यायालयाच्या परवानगीनंतरच सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून साई संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post