पूरग्रस्त भागाच्या दौर्यावेळी दिव्यांग शेतकर्यांला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची वैयक्तिक मदत

 मा.मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला

लवकरात-लवकर राज्य सरकारने पूर ग्रस्तांना मदत घ्यावी ;- मा.मंत्री कर्डिले दौऱ्यानिमित्ताने मागणी

अहमदनगर प्रतिनिधी-पाथर्डी तालुक्यातील तिसगाव,शिरापुर,करडवाडी,घाटसिरस ,देवराई ,त्रिभुवनवाडी चिचोंडी शिराळ या गावातील अतिवृष्टीमुळे शेतीची पिकांची खूप मोठया प्रमाणात नुकसान होऊन ओढे नालेच्या पुरामध्ये वाहून गेलेले शेततळे, विहिरी तसेच शेतकर्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहचे जनावरे,शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या आदि पुर परिस्थितीची पाहणी  करताना माजी मंत्री शिवाजी कर्डीले समवेत जि.प.सदस्य पुरुषोत्तम आठरे,मा सभापती बाळासाहेब अकोलकर,पंचायत समितीचे सदस्य एकनाथ आटकर,मार्केट कमिटीचे संचालक बाबा खर्से,पं. स.सदस्य एकनाथ आटकर,धिरज मैड,रवि भापसे,बाळासाहेब लवांडे,भाऊसाहेब लवांडे,अनिल पालवे,दादासाहेब चोथे ,महेंद्र शिरसाठ, अर्जुन बुधवन्त,बापू कुटे, संतोष टापरे,गोरख कारखीले, शिवाजी कारखीले,अंबादास कारखीले, कृषी सहाय्यक राठोड आदी  यावेळी शिरापुर येथील अपंग शेतकरी यांच्या पत्नीने सांगितले की पुरामध्ये  त्यांच्या 100 कोंबड्या व शेळ्या वाहून गेलेल्याची व्यथा मा.मंत्री कर्डीले कडे मांडल्या नंतर त्यांनी लगेच वयक्तिक 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली व यावेळी विविध गावांना भेटी देऊ पूरग्रस्तांना कडून परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. व सरकार कडे पूरग्रस्तांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post