पालकमंत्री हसन मुश्रीफांना नगर जिल्ह्यात ‘नो एंट्री’, भाजपचा इशारा

पालकमंत्री हसन मुश्रीफांना नगर जिल्ह्यात ‘नो एंट्री’, भाजपचा इशारा

  


नगर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. या आरोपातून जोपर्यंत पालकमंत्री मुश्रीफ यांना क्लीनचीट मिळत नाही. तोपर्यंत त्यांचे मंत्रीपद व पालकमंत्रीपद काढून घेण्यात यावे. अन्यथा भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना नगर जिल्हयात फिरु देणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिला आहे. 

मुंडे यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील आघाडी सरकार हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे सरकार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या दौ-यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल या भितीपोटी सोमय्या यांच्याविरुद्ध केलेली दडपशाही क्रुती ही सरकारची पळपुटेपणाची युक्ती आहे. भ्रष्टाचा-यांना पाठिशी घालून तो उघडकीस आणणा-यांवरच कारवाई करण्याच्या या धोरणामुळेच हे आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.  

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघडी पडली आहेत. सरकारमधील अनेक मंत्र्यावर आरोप होत आहेत. यामुळे अस्वस्थ असलेले पक्षाचे कार्यकर्ते सरकारी पाठबळावर पोलिसांसमोर हाणामा-या करून कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडवत आहेत. पक्षाचे नेते सोमय्या यांनी सुरू केलेल्या या भ्रष्टाचारविरोधी मोहीमेत भाजप पूर्णपणे त्यांच्यासोबत असून ही लढाई निर्णायकपणे लढवली जाईल असा इशाराही त्यांनी पत्रकात दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post