गणेशोत्सवातील अति उत्साह करोना वाढीस पोषक, तज्ज्ञांनी दिला मोठा इशारा

 

गणेशोत्सवातील अति उत्साह करोना वाढीस पोषक, तज्ज्ञांनी दिला मोठा इशारामुंबई: देशातील अनेक राज्यात सार्वजनिक उत्सवांनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं यापूर्वीही दिसून आलं आहे. नुकतंच केरळमध्ये ओणमनंतर रुग्णसंख्या वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. महाराष्ट्रातही सध्या गणेशोत्सव साजरा होत असून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचं चित्र आहे. बहुतांश नागरिका सध्या मास्क वापरत नसल्याचं चित्र दिसत असून त्यामुळे कोरोना वेगाने फैलावण्याची भीती राज्याचे सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केलं आहे.

गणेशोत्सवाच्या काळात जर कोरोना संकेतांचं नीट पालन केलं, तर मात्र कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्यापासून रोखली जाऊ शकते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गणेश मंडळांनी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशनची काळजी घेणं, मास्कशिवाय प्रवेश न देणं ही खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाची केंद्रं वाढवणं आणि त्याचबरोबर टेस्ट आणि औषध पुरवठा यांची सोय करणं गरजेचं असल्याचा सल्लाही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post