मुख्यमंत्री म्हणतात भाजप भावी सहकारी, इकडे नगरमध्ये भाजप व शिवसेना पदाधिकार्‍यांची एकत्रित गणेश आरती

 मुख्यमंत्री म्हणतात भाजप भावी सहकारी, इकडे नगरमध्ये भाजप व शिवसेना पदाधिकार्‍यांची एकत्रित गणेश आरतीनगर : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बोलताना भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्यभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना व भाजपमधून मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचे स्वागतच होत असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान नगर शहरात शिवसेना व भाजप पदाधिकारी गणेशोत्सवानिमित्त एकत्र आल्याचे पहायला मिळाले. नेता सुभाष चौक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला भाजप पदाधिकार्‍यांनी हजेरी लावून गणपतीची एकत्रित आरती केली. पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते ऍड.अभय आगरकर, वसंत लोढा,, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी या भाजपच्या मंडळींसह महापौर रोहिणी शेंडगे, सभापती पुष्पाताई बोरुडे, सभागृह नेते बडे, मंडळाचे प्रमुख विक्रम राठोड ही शिवसेनेची मंडळी एकत्र आली होती. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post