नगर तालुक्यात एकाची हत्या!

 अहमदनगर - लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर मारहाण करुन जबर जखमी करुन हात पाय दोरीने बांधुन जिवे ठार मारल्याची घटना नगर जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात हॉटेल सार्थक येथे घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव कैलास घोडके असे नाव आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात हॉटेल सार्थक या ठिकाणी दि. 14 सप्टेंबर  रोजी रात्री 3 वा. ते दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आठवड घाटात आरोपी  संतोष तुळशीरम सुरदुसे ( रा दर्यापुर ता. दर्यापुर जि अमरावती) व मयत कैलास घोडके या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाल्याने यातील आरोपी संतोष याने मयत घोडके याला लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर मारहाण करुन जबर जखमी केले. यानंतर  हात-पाय दोरीने बांधून घोडके याला जिवे ठार मारले, या  संजय नवनाथ खाकाळ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेची माहिती समजताच, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके आणि नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप आणि पोसई चव्हाण, पोसई जारवाल व पोलिस कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर घटनास्थळाची पाहणी करून -गुरनं। 515/2021 भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post