आ.रोहित पवार यांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची भेट... मतदारसंघासाठी केल्या महत्त्वपूर्ण मागण्या

 

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या आर्थिक विकासासाठी आ.रोहित पवार यांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची भेटनगर:  कर्जत-जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन  धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली.

कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे, यामुळे ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी आमदार पवार यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

सोबतच मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची असलेली संख्या कमी आहे, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटीत बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे यासाठी रोहित पवार प्रयत्नशील आहेत. केंद्राच्या अखत्यारीत असणारा हा विषय मार्गी लावण्यासाठी आ. रोहित पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन विनंती केली.


शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post