चिंता वाढली......आता खतरनाक निपाह व्हायरसची देखील भर

 चिंता वाढली......आता निपाह व्हायरसची देखील भर  केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं चिंता वाढवलेली असताना आता निपाह व्हायरसची देखील त्यात भर पडली आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा निपाह विषाणूची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं दिसून आल्यानंतर स्थानिक रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं.   राज्य सरकारनं निपाह विषाणूचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री उशिरा आरोग्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. 

केंद्र सरकारकडून देखील याची पुष्टी झाली असून केंद्राचंही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशी सर्व मदत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला करण्यात येईल असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post