लस घेताना नीट लक्ष ठेवा...एकाला करोना ऐवजी दिली गेली रेबीजची लस...

लस घेताना नीट लक्ष ठेवा...एकाला करोना ऐवजी दिली गेली रेबीजची लस... ठाणे: ठाणे महापालिकेची लसीकरण मोहीम तेजीत सुरू असतानाच कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालिकेच्याच आरोग्य केंद्रावर रेबीजची लस दिल्याचा प्रकार घडल्याने ठाणे महापलिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. रेबीज लस दिलेल्या त्या व्यक्तीची प्रकृती सद्या स्थिर असून आरोग्य केंद्रवरील उपस्थित असलेल्या डॉक्टर राखी तावडे आणि नर्स कीर्ती रायात यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post