मोठी बातमी...मोदी सरकारने अजित पवारांना दिली महत्त्वाची जबाबदारी....

 

मोठी बातमी...मोदी सरकारने अजित पवारांना दिली महत्त्वाची जबाबदारी....नवी दिल्ली: लखनऊमध्ये  पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलच्या  बैठकीनंतर केंद्र सरकारने  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी प्रणाली सुधारणांवर मंत्र्यांचा एक गट   तयार केला आहे. पवार हे मंत्रिगटाचे संयोजक असतील, तर त्यांच्या सदस्यांमध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बग्गाना राजेंद्रनाथ यांचा समावेश आहे.

  महत्त्वाच्या समितीचे संयोजक पद अजित पवारांना दिल्यामुळे भाजप राष्ट्रवादी एकमेकांना टाळी देतेय का अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post